now face shield will Protect doctors, nurses and police from corona virus.jpg
now face shield will Protect doctors, nurses and police from corona virus.jpg 
पुणे

आता 'फेसशिल्ड' करणार कोरोनापासुन डॉक्‍टर, परिचारिका आणि पोलिसांचे संरक्षण

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका व पोलिसांच्या आरोग्यासाठी पाषाण येथील टिंकरींग लॅबने व्हेंचर सेंटरच्या सहकार्याने खास 'फेसशिल्ड' तयार केले आहे. या फेसशिल्डद्वारे डॉक्‍टर, परिचारिका व पोलिसांचे कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. पुणे पोलिसांना आत्तापर्यंत तीन हजार फेसशिल्ड देण्यात आले आहे. याबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलिस, शहरातील काही रुग्णालयांमधील डॉक्‍टर, परिचारींकाना फेसशिल्ड दिले जाणार आहे. 

केंद्र सरकारकारच्या मानांकनानुसार, नागरीकांसाठी वैयक्तीक संरक्षण उपकरण (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार, पाषाण येथील व्हेंचर सेंटर या देशातील सर्वात जुन्या इन्क्‍युबेटरमध्ये सेंटरमध्ये उद्योजकांना नवनिर्मीतीसाठी प्रोत्सहन दिले जाते. त्यानुसार, 20 हून अधिक उद्योजकांच्या सहभागाने व्हेंचर सेंटरमच्या टिंकरींग लॅबमध्ये फेसशिल्डची निर्मिती केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रार्दूर्भाव रोकण्यासाठी फेसशिल्ड या स्टार्टअपची निर्मिती करण्यात आली आहे. 

फेसशिल्डची निर्मिती प्रकल्पाचे नेतृत्व जसवीर सिंग हे करीत आहेत. याविषयी सिंग म्हणाले, "कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यावसाय ठप्प झाले आहेत. अनेक मोठमोठे उद्योजक बसून आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपणही योगदान द्यायला पाहीजे, या हेतूने फेसशिल्डच्या निर्मितीची संकल्पना पुढे आली. त्यानुसार, आम्ही 20 जणांनी एकत्र येऊन टिंकरींग लॅबमध्ये फेसशिल्ड बनविण्यास प्रारंभ केला. कोरोनाशी आघाडीवर लढा देणाऱ्या डॉक्‍टर, परिचारीका व पोलिसांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी फेसशिल्ड तयार केले आहे.'' 

पुणे पोलिसांना आत्तापर्यंत तीन हजार फेसशिल्ड देण्यात आले आहेत. तर आणखी दिड हजार फेसशिल्ड त्यांना द्यायचे आहेत. याबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दोन हजार, वैद्यकीय क्षेत्राकडून चार हजार फेसशिल्डची मागणी करण्यात आली आहे. याविषयी उद्योजक संजय कानविंदे म्हणाले, ""प्रारंभी 200 ते 300 फेसशिल्ड तयार केले जात होते. आता दर दिवशी दिड हजार फेसशिल्ड तयार केले जात असून त्यास मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. उपक्रमासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.'' 

असा होतो फेसशिल्डचा उपयोग ! 
कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्‍टर, परिचारीका किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांना कोरोना विषाणुची लागण होऊ शकते. हा विषाणू हाताद्वारे तोंड,नाक व डोळ्यातून शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे या विषाणुपासूनच चेहऱ्याचे संरक्षण होणे अत्यावश्‍यक असे. त्यादृष्टीने फेसशिल्ड चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. 

फेसशिल्डची वैशिष्ट्ये 
* ऍन्टी फॉगींग 
* सहज वापरायोग्य इलेस्टीक बॅंड 
* सहज वापरता येणारी स्क्रीन 
 
अधिक माहितीसाठी संपर्क - 9850037832 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT