पुणे

पुणेकरांनो घाबरू नका; कोरोनाबाबत आहे ही गुड न्यूज!

गजेंद्र बडे

पुणे : पुणेकरांनो, पुणे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. आज अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ६ हजार ९१२ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. बरे होण्याचे हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ६३.९२ टक्के (सुमारे ६४ टक्के) एवढे आहे. 

सध्या केवळ ३ हजार ४४० इतके अल्प रुग्ण उरले आहेत. या सर्वांवर पुणे शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिल्लक रुग्णांचे हे प्रमाण केवळ ३१.८३ टक्के (सुमारे ३२ टक्के) आहे. याशिवाय आतापर्यंत ४६० रुग्णांचा बळी गेला असून, हे प्रमाण ४.२५ टक्के इतके अल्प आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत दररोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णांबाबतच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्ह्यात आज अखेरपर्यंत (ता.१२) एकूण १० हजार ८१२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ६ हजार ९१२ जण पुर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ४६० बळी गेले असून आता फक्त ३ हजार ४४० जण कोरोनाग्रस्त आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या शिल्लक राहिलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वांधिक २ हजार ६०१ जण पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील ५६३ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डांसह) २७६ रुग्णांचा समावेश आहे.

आणखी १६७४ अहवाल बाकी

दरम्यान, आतापर्यंत कोरोना निदानासाठी ६५ हजार १७३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन, कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ५९ हजार ६३८ जणांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले आहे. मात्र आणखी १ हजार ६७४ जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अडीचशे जणांची प्रकृती गंभीर

सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २५५ जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी ५० जणांना कृत्रीम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले आहे. एकूण गंभीर रुग्णांपैकी पुणे शहरातील २१५, पिंपरी चिंचवडमधील १५ आणि ग्रामीण भागातील २३ रुग्णाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

Nashik News : एकाचवेळी जीएसटी, आयटीआर आणि ऑडिट: करदात्यांसमोर मोठे संकट

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

पोलिसांचा धक्कादायक कारनामा समोर; ट्रक थांबवण्यासाठी केली दगडफेक; नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT