yerwada 
पुणे

मनोरुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या शंभर 

दिलीप कु-हाडे

येरवडा : मनोरूग्णालयातील अस्वच्छता आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे गेल्या वीस महिन्यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या शंभर झाली आहे. यामध्ये विशेषत: क्षयरोग व जंतू संसर्गामुळे हे रुग्ण दगावले असून रुग्णांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समितीची (डेथ ऑडिट कमिटी) स्थापना केल्याची माहिती डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयात सध्या नऊशे पुरूष रुग्ण तर सहाशे महिला रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयातील अस्वच्छता आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या वीस महिन्यात शंभर रुग्ण मृत्यूमुखी पडले अाहेत. या सर्वांचे मृत्यूचे कारण क्षयरोग किंवा जंतूसंसर्ग असे दिले आहे. येरवडा पोलिस ठाण्यात रुग्णांच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

या संदर्भात डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘ रुग्णालयात अनेक वेळा बेवारस रुग्ण दाखल होत असतात. त्यासह पोलिस सुद्धा रुग्णांना दाखल करून जातात. रुग्णालयात रुग्ण येण्यापूर्वीच त्यांना अनेक गंभीर आजार असतात. त्यांची तपासणी करून उपचार करण्यापूर्वीच अशा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या अधिक दिसते. यावर उपाय म्हणून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. त्यामुळे भविष्यात दाखल केलेले रुग्ण मृत्यूमुखी पडणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. ’’ 

गंभीर आजार असलेल्या मनोरुग्णांवर ससून रुग्णालयात तत्काळ उपचार व्हावेत म्हणून काही खाटा किंवा स्वतंत्र कक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे रुग्णांना वाचविता येईल.’’
- डॉ. अभिजित फडणीस, अधिक्षक, येरवडा मनोरुग्णालय 

रुग्णांना सोब
मनोरुग्णालयातील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करतात. त्यांच्यासोबत दिवस-रात्रीच्या वेळेत परिचर असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक परिचर रुग्णांना ससूनमध्ये दाखल करुन घरी पळ काढतात. रुग्णांच्या मृत्यूला परिचर जाबदार असल्याचा ठपका ससूनमधील डॉक्टरांनी लेखी मनोरुग्णालय प्रशासनाला कळविले आहे. तरी सुद्धा अशा बेजबाबदार परिचरांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT