पुणे

मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने परिचारिकेची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

वाघोली -  कुटुंबीयांकडून मनाविरुद्ध लग्न ठरविल्याच्या कारणामुळे खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिकेने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना येथील एका खासगी रुग्णालयात घडली.

प्रियंका कांबळे (वय २१, रा. नवले हॉस्पिटल, मूळ रा. उदगीर, लातूर) असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे. प्रियंका ही वाघोलीतील नवले रुग्णालयातील एका खोलीमध्ये राहात होती. दरम्यान, कुटुंबीयांकडून मनाविरुद्ध लग्न ठरविले जात असल्याने ती गेल्या चार दिवसांपासून तणावाखाली होती. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ती खोलीमध्ये एकटीच होती. त्या वेळी तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या सहकारी जेवणासाठी तिच्या खोलीत पाणी आणण्यासाठी गेल्या, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये मनाविरुद्ध लग्न ठरविले जात असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT