पुणे

नगर- धामनवन येथे नाचणी पिकांबाबत शेतकर्‍यांना कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

CD

धामनवन येथील शेतकऱ्यांना
नाचणी पिकांबाबत मार्गदर्शन

कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची गावाला भेट; बियाण्याचे वाटप

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा पौष्टिक तृणधान्य प्रकल्प राबविला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांत राबविला जात आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांनी धामनवन (ता. अकोले) या दुर्गम गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, उद्यानविद्या विषयाचे सहायक प्रा. अन्सार खान अत्तार, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे सहायक प्रा. डॉ. सुनील अडांगळे यांचा समावेश होता. या वेळी धामणवन येथील हनुमान शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. खर्डे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाची माहिती दिली. अकोले तालुक्यातील या दुर्गम भागात पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने घेणाऱ्या नागली पिकाला आता आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आले आहे. नाचणीमधील पौष्टिक गुणधर्म पाहता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले कासारी नावाचा वाण विकसित केलेला आहे. शेतकऱ्यांनी या वाणाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
प्रा. अत्तार यांनी शेतकऱ्यांना फळपिके आणि भाजीपाला पिकांबद्दल माहिती दिली. डॉ. अडांगळे यांनी दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी चारा पिकांचे महत्त्व तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी या शेतकरी गटाला फुले कासारी या नागली वाणाच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी संतुलित खत वापराविषयी आणि खेत बचाओ अभियान याबद्दल जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या भाताची फुले समृद्धी वाणाच्या रोपवाटिकेला शास्त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रसंगी शेतकरी गटाचे अध्यक्ष लक्ष्मण धराडे, सचिव नामदेव सुकटे, यशवंत बारामते आणि सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळी ----
धामनवन, ता. अकोले ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या रोपांची पाहणी केली.
PNE26W40342

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT