Lakshman Hake 
पुणे

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

हाके यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी मराठा तरुणांनी केली आहे.

सकाळ ऑनलाईन

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. काही मराठा तरुणांनी हा आरोप करताना हाके यांना कोंढवा पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रामाणावर मराठा समाजातील तरुण आणि माध्यमांचे प्रतिनिधी दाखल झाले आहेत. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

लक्ष्मण हाके हे पुण्यातील कात्रज-कोंढवा रोड परिसरात असताना काही मराठा सामाजातील तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्याबाबत हाके यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर हे तरुण त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होते. पण यावेळी हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोपही या तरुणांनी केला आहे.

यातून त्यांच्यामध्ये वाद वाढत गेल्यानं हाके आणि मराठा तरुण हे कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी मराठा तरुणांनी हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासंपूर्ण घटनेचा आणि पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मद्यप्राशन केल्याचा आपल्यावर जाणीवपूर्वक आरोप केला जात असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक वाद घालत माझ्यावर हल्ला करण्यात आला, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटल्याचं विविध वृत्तवाहिन्यांतील वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT