पुणे

सिंगापूर गटाची जबाबदारी सुळेंकडे मैत्री गटांमध्ये विविध नेत्यांचा समावेश

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २४ : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी साठपेक्षा जास्त देशांसाठी स्थापन केलेल्या संसदीय मैत्री गटांमध्ये विरोधी पक्षांमधील काही नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. सिंगापूरसोबत व्यापार करारावर चर्चा करणाऱ्या समूहात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे, तर खा. अशोक चव्हाण यांच्याकडे अर्जेंटिना या देशांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मित्र देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हे समूह काम करतील. सिंगापूरसाठी नेमण्यात आलेल्या समूहाचे नेतृत्व खा. सुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. या समूहांच्या माध्यमातून भारत आणि संबंधित देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना दिली जाणार आहे. जगातील विविध देशांसाठी नेमण्यात आलेल्या संसदीय मैत्री समूहात ज्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे, त्यात रविशंकर प्रसाद, थंबीदुराई, पी. चिदंबरम, रामगोपाल यादव, टी. आर. बालू, काकोली घोष दस्तीदार, गौरव गोगोई, मनीष तिवारी, डेरेक ओ ब्रायन, अभिषेक बॅनर्जी, असदुद्दीन ओवेसी, अखिलेश यादव, के. सी. वेणूगोपाल, राजीव प्रताप रुडी, संजय सिंह, बैजयंत पांडा, शशी थरुर, निशिकांत दुबे, अनुराग ठाकूर, हेमामालिनी यांचा समावेश आहे.
इंडोनेशियाला जाणाऱ्या गटाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे करतील, तर ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून प्रफुल्ल पटेल हे काम पाहतील. अरविंद सावंत हे मोरोक्कोला जाणाऱ्या गटाचे नेतृत्व करणार आहेत. केनियाला जाणाऱ्या गटात नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांचा, तर चिली देशात जाणाऱ्या गटात रवींद्र वायकर यांचा समावेश करण्यात आला आहे. वर्षा गायकवाड आणि श्रीरंग बारणे हे बाल्टिक देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT