on the occasion of republic day three jewels society adventure programs pune Sakal
पुणे

Republic Day : प्रजासत्ताकदिनानिमीत्त थ्री ज्वेल सोसायटीत साहसी प्रयोग

टिळेकरनगरमधील थ्री ज्वेल सोसायटीत प्रजासत्ताकदिनानिमीत्त थ्री ज्वेल सोसायटीत साहसी प्रयोग करण्यात आले. सोसायटी मध्ये ७५वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व साहसि प्रयोग करून साजरा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : टिळेकरनगरमधील थ्री ज्वेल सोसायटीत प्रजासत्ताकदिनानिमीत्त थ्री ज्वेल सोसायटीत साहसी प्रयोग करण्यात आले. सोसायटी मध्ये ७५वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व साहसि प्रयोग करून साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वायुसेना मधून सेवानिवृत्त विंग कमांडर अधिकारी शशिकांत ओक व कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनावणे उपस्थित होते. अॅडवेंचर वर्ल्ड या साहसी प्रयोग करणाऱ्या कंपनीतील सदस्यांनी सोसायटीत साहसी दृश्यांटी प्रात्याक्षिके दाखविली.

यावेळी कंपनीचे सदस्य संजय डोफे व साहस डोफे यांनी १४० ते १५० फूट इमारतीच्या उंचीवरून झिप लाईन व रॅपलिंग करत भारतीय झेंडा घेवून झेप घेतली व ध्वजारोहण केले. त्यानंतर अंदाजे ५० रहिवाशांनी सुद्धा ह्या साहसिक झिप लाईनचा आनंद घेतला.

या वर्षी काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचे विचाराने थ्री ज्वेल्सचे अध्यक्ष अभिजीत शाह ह्यांनी संपूर्ण सदस्यांसोबत भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले डोफे यांना साहसी प्रयोग करण्यासाठी निमंत्रित केले होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोपाल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांसह रवींद्र वाघ, संदीप पोकळे, सूर्यकांत खुरूसे, शौनक सुगंधी, सिद्दू बिदारी, दीपक गवळी, अविनाश हिंगमिरे, हितेंद्र भवर, सुजय काटकर, पांडुरंग भोले, प्रल्हाद दुधाळ यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT