one arrested after Eleven years for theft
one arrested after Eleven years for theft 
पुणे

घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला तब्बल अकरा वर्षांनी अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात व अकलूज पोलिस ठाण्यातील संघटित गुन्हेगारी (मोका) प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने तब्बल अकरा वर्षांनी अटक केली आहे. सनी ऊर्फ विष्णू धर्मा कांबळे (वय 48, रा. गांधीनगर, देहूरोड व सध्या रा. गायकवाड वस्ती, इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

भारती वस्तवडे (रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) व त्यांच्या शेजारील घराचे कोयंडे उचकटून चोरट्यांनी 27 जून 2009 रोजी 47 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल भोसले आणि शत्रुघ्न भोसले यांना 10 फेब्रुवारी 2010 रोजी अटक करण्यात आली होती. परंतु, कांबळे पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

दरम्यान, नुकताच कांबळे हा पारधी वस्तीवर लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार महेश निंबाळकर यांना मिळाली होती. या बाबत सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ इंदापूर पोलिस ठाणे गाठून तेथील कर्मचाऱ्यांची मदत घेतली. कांबळे याला पारधी वस्तीवरून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याला पुण्यात आणण्यात आले.

कांबळे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत 22 फेब्रुवारी 2014 रोजी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना कोयता, चाकूचा धाक दाखवून लोखंडी पाइपने मारहाण करून लुटले होते. त्यांनी 82 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला होता. या प्रकरणात दरोडा आणि मोक्काच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. गुन्ह्यातील सर्व जणांवर 10 ते 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT