crime_logo
crime_logo 
पुणे

मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अटक

सकाळवृत्तसेवा

खडकवासला : डोक्यात दगड घालून नऱ्हे येथे मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी येवलेवाडी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. 

नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रोड, येथे बांधकामच्या ठिकाणी काम करणारा मजुर रजनीश ऊर्फ पपू राजघर पाटील याने त्याच्या रुममध्ये राहणारा व त्याचा जुना मित्र किरण काटकर याच्यासोबत सोमवारी 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात घरून किरण काटकर याचे डोक्यात दगड घालून त्याचा खून करून पळून गेला होता.

नऱ्हे पोलिस चौकीचे प्रभारी
अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हि.बी.जगताप व सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी हे पळून गेलेला आरोपी रजनीश ऊर्फ पप्पु राजधर पाटील याचा शोध घेत होते. दोन पथक तयार करून शोध सुरू होता. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक निलेश जमदाडे, पोलिस शिपाई बालाजी जाधव व पोलिस शिपाई निलेश कुलथे यांना आरोपी पाटील हा येवलेवाडीला बाभळीची झाडे असलेल्या ठिकाणी लपून बसल्याची माहिती दिली. त्याने तो लपलेले ठिकाण पोलिसांना दाखविले. बाभळीचे झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीस उठवुन त्यास ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव रजनीश ऊर्फ पप्पु राजधर पाटील, वय २९ वर्षे, रा. मु.पो. फागणे, ता.जि. धुळे असे सांगीतले. त्याला त्याचा मित्र किरण काटकर याच्या खुनाच्या गुन्हाबाबत विचारले असता. रागाच्या भरात त्याने तो खून केल्याचे कबुली दिली. त्याला पोलिस ठाण्यात आणून बुधवारी सायंकाळी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT