पुणे

पिंपरीत आठवड्यात एक दिवस पाणी बंद

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  शहरातील पाणीपुरवठा एका भागात आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. १) करण्यात येणार आहे. शहराचे सात भाग करण्यात आले असून, पाणीपुरवठा बंद राहण्याचे दिवस निश्‍चित झाले आहेत. पवना धरणात असलेला कमी पाणीसाठा आणि उन्हाळा या कारणांमुळे पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पवना धरणात सध्या ४९.८५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ५८ टक्के होता. यंदा पाणीसाठा कमी असल्यामुळे, रोज दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेला केली होती. सध्या दररोज ४८० ते ४८५ दशलक्ष लिटर घेते. ते ४४० एमएलडी एवढे घ्यावे, असे जलसंपदा विभागाने कळविले होते. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धरणांतील पाणीसाठा पुरेल, असे त्यांचे मत होते. 

 उन्हाळ्यात पाण्याची मागणी सुमारे १५ टक्‍क्‍यांनी वाढते. त्याचा ताण पाणीपुरवठा यंत्रणेवर येतो. काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता असते. आठवड्यातून एक दिवस एका भागातील पाणीपुरवठा बंद ठेवल्यास १४ टक्के पाणी वाचते. काही पाणी अन्य भागांत पुरविल्यास पुरेसे पाणी मिळू शकते. हे लक्षात घेऊन गेला महिनाभर पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा आग्रह धरला होता. त्या वेळी राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे अंमलबजावणी करता आली नव्हती. 

जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पाणीवापरामध्ये कपात करण्यासाठी सुरवातीस आठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. पावसाची अनिश्‍चितता व धरणातून वेगाने कमी होत असलेला साठा या बाबी लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे.
- मकरंद निकम, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT