one died on the spot accident chandani chowk pune 
पुणे

चांदणी चौकात अपघात; अज्ञान वाहनाने एकाला उडविले,जागीच ठार

सकाळवृत्तसेवा

पुणे : चांदणी चौकात डुकरं खिंडीच्या जवळ वारजे येथील दुसऱ्या उड्डान पुलावर एक अपघात झाला आहे. हा अपघात आज (ता.20) दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान झाला आहे. या अपघातामध्ये  एक जण जागीच ठार झाल्याचे समजते आहे. अज्ञात वाहनाने एकाला उडवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर वाहतूकीचा वेग मंदावला आहे. वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे बंगलोर महामार्गावर डुक्कर खिंडीजवळ वंडर फ्युचरा समोर असणाऱ्या पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. वारजे  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बद्रीप्रसाद जुन्नराम यादव (वय - 40, रा. साईलीला, कदम-  वाघवस्ती, लोणीकाळभोर) याचा या धडकेत जागीच मृत्यू झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यादव हे वारजे कडून चांदणी चौकाच्या दिशेने दुचाकीवर चालला होता. दुपारी साडे तीनच्या सुमाराला अज्ञात ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याने रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. पुढील तपास वारजे पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT