Road Cleaning sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात येत्या १ ऑक्टोबरला "एक तास स्वच्छतेचा" - जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

केंद्र पुरस्कृत ज स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील गावा-गावात येत्या १ ऑक्टोबरला 'स्वच्छतेसाठी एक तास' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र पुरस्कृत ज स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील गावा-गावात येत्या १ ऑक्टोबरला 'स्वच्छतेसाठी एक तास' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या सहकार्याने गावा-गावांत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि वाडी-वस्तीतील सर्व घटकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदींना दिला आहे.

'स्वच्छता हीच सेवा' या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. यावेळी तहसीलदार दीपक आकडे, नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, 'स्वच्छता हीच सेवा' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंकल्पनेतील महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १ ठिकाण आणि नगरपरिषद यांनी प्रत्येक वॉर्डात २ ठिकाणे निवडून स्वच्छता विषयक कार्यक्रम आयोजित करावेत. या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गट आणि स्वच्छतादूत आदींना सहभागी करून घेतले जाणार आहे.'

स्वच्छता मोहिमेसाठीची प्रमुख ठिकाणे

- सर्व धार्मिक आणि पर्यटन स्थळे

- जिल्ह्यातील सर्व किल्ले

- गावातील सार्वजनिक ठिकाणे

- बाजारपेठा, रेल्वेमार्गाच्या बाजूची ठिकाणे

- सर्व सरकारी कार्यालये

- शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालये व परिसर

या मोहिमेत जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतेसाठी श्रमदान केले जाणार आहे. या मोहिमेत श्रमदानासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी - कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT