Dr. Rajesh Deshmukh Sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात ‘एक तास स्वच्छतेचा’ उपक्रम; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

केंद्र पुरस्कृत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील गावागावांत रविवारी (ता. १) ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

प्रशांत पाटील

पुणे - केंद्र पुरस्कृत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील गावागावांत रविवारी (ता. १) ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या सहकार्याने गावागावांत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि वाड्यावस्त्यांतील सर्व घटकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदींना दिला आहे.

‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. यावेळी तहसीलदार दीपक आकडे, नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘स्वच्छता हीच सेवा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक ठिकाण आणि नगरपरिषद यांनी प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणे निवडून स्वच्छता विषयक कार्यक्रम आयोजित करावेत. या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गट आणि स्वच्छतादूत आदींना सहभागी करून घेतले जाणार आहे.’

या मोहिमेत जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतेसाठी श्रमदान केले जाणार आहे. या मोहिमेत श्रमदानासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

प्रमुख ठिकाणे

  • सर्व धार्मिक आणि पर्यटन स्थळे

  • जिल्ह्यातील सर्व किल्ले

  • गावातील सार्वजनिक ठिकाणे

  • बाजारपेठा, रेल्वेमार्गाच्या बाजूची ठिकाणे

  • सर्व सरकारी कार्यालये

  • शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालये व परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT