one killed in pmpml bus and two wheeler accident sinhagad road pune police  Sakal
पुणे

Pune Accident : बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील घटना

पीएमपीएमएल बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

निलेश बोरुडे

सिंहगड: पीएमपीएमएल बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

राजू तानाजी बोरगे (वय 38 सध्या रा. भैरवनाथ नगर किरकटवाडी, मूळ रा. शिरकोली ता. वेल्हे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खाजगी कंपनीत नोकरी करत असलेल्या राजू बोरगे यांची पत्नी पानशेत जवळील शिरकोली ( ता.वेल्हे) या गावची ग्रामपंचायत सदस्य असल्याने बोरगे यांचे सारखे गावी येणे-जाणे होते. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावाच्या दिशेने जात असताना डोणजे बाजूकडून भरधाव वेगाने येत असलेल्या पीएमपीएमएल बस व दुचाकीवर असलेल्या बोरगे यांची समोरासमोर धडक झाली.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अत्यवस्थ स्थितीत पडलेल्या बोरगे यांना गोऱ्हे बुद्रुक येथील ऑस्करवाडी मिसळच्या चालकांनी स्वतःच्या रिक्षाने उपचारांसाठी नेले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष तोडकर, कॉन्स्टेबल मकसुद सय्यद हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस हवालदार विजय कांबळे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रमक केला

Electric Scooter : फक्त 1 रुपयांत 4 कि.मी. प्रवास; किंमत 45 हजार, 'ही' आहे सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Junnar Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून; पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीने रचला बनाव

SCROLL FOR NEXT