accident Sakal Media
पुणे

सोलापूरला लग्नसमारंभासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; 1 ठार, 6 जखमी

लग्नासाठी चाललेल्या टेम्पोचा अपघात, पोलिसांनी घेतली तात्काळ दखल.

अमर परदेशी, वरवंड

पाटस ःपुणे सोलापुर महामार्गाने सोलापुरला लग्न समारंभासाठी कुटुंबातील व्यक्तींना घेऊन निघालेल्या टेंपोची पाटस (ता. दौंड) हद्दीत रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. रविवारी (ता. १६) पहाटे हा अपघात झाला. सइद शिराज शेख (वय १९) रा. अप्पर सरगमचाळ पुणे असे मृत असलेल्या युवकाचे नाव आहे. तर शबाना भेळमे (वय ४०), नबी भेळमे (वय १६), पैगंबर भेळमे (वय १३) सर्व रा. भवानी पेठ पुणे तसेच तफिसा शेख, समिरा शेख, महेक शेख (सर्व रा. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या बाबत टेंपो चालक अमिन मुजावर यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी माहिती दिली. चालक अमिन पुणे-सोलापुर महामार्गाने टेंपोतून वरील लोकांना घेवून लग्नासाठी सोलापुरला चालला होता. रविवारी पहाटे पाटस हद्दीतील घाटात अंधारात भररस्त्यात एक ट्रक उभा होता. ट्रक न दिसल्याने टेंपो थेट ट्रकच्या पाठीमागे धडकला. या अपघात टेंपोचे मोठया प्रमाणात नुकसान होवून त्यामधील सर्व जण जखमी झाले.

माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाइक सुधीर काळे, घनशाम चव्हाण, विजय भापकर, निखील अवचट, मधुकर म्हस्के, अनिकेत म्हस्के, बाळासाहेब चोरमले, दादाराम बाबर आदींनी घनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी हे वेदनेने विवळत पडले होते. पोलिसांनी तत्काळ पाटस टोल नाक्यावरील रु्ग्णवाहीका बोलावून घेतली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले. यावेळी उपचार दरम्यान सइद शेख हे मृत झाले.दरम्यान, रस्त्यावर सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून ट्रक चालकाने कोणतीच खबरदारी घेतली नव्हती. बेजाबदार ट्रक उभा करुन अपघातास निमंत्रण दिल्याने पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

Mumbai Crime: आधी मिठी, गाल ओढून चावण्याचा प्रयत्न, नंतर गुप्तांगाला...; ६० वर्षीय नराधमाचे चिमुकल्यासोबत नको ते कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : खुलताबाद मतदान केंद्राबाहेर तणाव; उमेदवारांमध्ये आरोप–प्रत्यारोप, पोलिसांनी घेतली सूत्रे हाती

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

Ratnagiri Crime : खेडमध्ये धक्कादायक घरफोडी! ४.३२ लाखांचे सोनं-रोख पळविले; चोरट्यांनी कुलूप तोडत घराला टाकली लुट

SCROLL FOR NEXT