पुणे

पुण्यात आजपासून एक वेळ पाणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  शहर आणि उपननगरांतील नागरिकांना सलग पाच तास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या योजनेची सोमवारपासून (ता. २९) अंमलबजावणी होणार आहे. 

नव्या वेळापत्रकानुसार रोज पहाटे अडीच ते रात्री बारापर्यंत टप्प्याटप्याने पाणीपुरवठा होईल. सर्व भागांना समान पाणी पुरविण्यात येईल. मात्र, तांत्रिक कारणांमुळे पहिल्या दोन दिवसांत अडचणी येऊ शकतात, अशी शक्‍यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होण्याची भीती आहे. 

शहराच्या पाणीसाठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतला आहे. त्यानुसार शहराला सध्या रोज १३५० पैकी ११५० ‘एमएलडी’ पाणी मिळणार आहे. त्यातच गेल्या २० दिवसांपासून बहुतांशी भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ज्या भागात पाच तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होणार आहे, तेथे कपात करून सरसकट पाच तास पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. 

सर्व भागांना समान पाणीपुरवठा होणार आहे. जलकेंद्रानुसार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होईल. त्यात अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना पाणीपुरवठा खात्याला केली आहे.
-मुक्ता टिळक, महापौर

शहरात आता रोज एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. वेळापत्रकानुसार लोकांना पुरेसे पाणी मिळेल. पाण्याच्या वितरणव्यवस्थेची तपासणी केली आहे. 
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

सुरळीत पुरवठ्याची लेखी हमी?
पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत शिवाजीनगरमधील आंदोलनकर्त्यांनी महापौरांकडून लेखी हमी घेतल्याची चर्चा होती. तसे काही झाले नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, लोकांनी दिलेल्या निवेदनाच्या एका प्रतीवर सही केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

"हा सिनेमा सिक्वेल नाही" पुन्हा शिवाजीराजे सिनेमाच्या वादावर महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मनसे मेळाव्यासाठी राज ठाकरे दाखल

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

साेलापूर हादरलं! 'डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून युवकाचा निर्घृण खून'; गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एकमधील घटना..

SCROLL FOR NEXT