कांद्याच्या दरासाठी
ताफा अडविण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : विश्व मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने नाशिकमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफा अडवण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. कांद्याला हमीभाव द्या आणि मराठी शाळा बंद करु नका, अशी मागणी या आंदोलकांनी केली. कांद्याला भावांतर योजना लागू करावी. मक्याची खरेदी करताना तिला मर्यादा घालू नये. खरेदी प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ‘प्रहार’ने हे आंदोलन केल्याची भावना गणेश निंबाळकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी निंबाळकर यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.