पुणे

कांदा रुपया किलो,चार महिन्यात कांदा उत्पादकाचे बुडाले ४०० कोटी रुपये, केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा बसला फटका ''

CD

कांदा विकतोय मातीमोल; चार महिन्यांत उत्पादकाचे बुडाले ४०० कोटी
केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा बसला फटका; खर्च प्रतिकिलो पोचला १८ रुपयांपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. १६ : कांद्याला बाजारात अवघा एक रुपया प्रतिकिलो इतका नीचांकी दर मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या कांद्यामध्ये शेतकऱ्यांच्या खिशातील जवळपास ४०० कोटी रुपये बुडाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत राबवलेल्या ग्राहकधार्जिण्या धोरणाचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
खरीप कांद्याला सुरुवातीच्या दोन महिन्यांत रास्त दर मिळाला. मात्र, अतिवृष्टीमुळे घटलेल्या उत्पादनामुळे यावेळीही शेतकऱ्यांच्या हातात काही पडले नाही. रब्बी हंगामात मात्र शेतकऱ्याची पुरती निराशा झाली आहे. नोव्हेंबरपासून कांद्याचे दर हे उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले आहेत. गेल्या चार महिन्यांची आकडेवारी पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या कांद्यामध्ये शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणुकीतील ३९५ कोटी रुपये बुडाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मोबदल्याचा त्यामध्ये हिशोब नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये कांद्याचे उत्पादन महागले आहे. बियाणे, वाढलेली मजुरी, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव, त्याचबरोबर विपरीत हवामान, उत्पादन घेताना औषधांवर करावा लागलेला खर्च यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १८ रुपयांपर्यंत पोचला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांत बाजारात कांद्याला सरासरी सहा रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा दहा ते बारा रुपयांचा तोटा होत आहे. शेतकऱ्यांना सरकार अनुदान देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या संदर्भात सरकार मौन बाळगून असल्यामुळे उत्पादकांची निराशा झाली आहे.

चौकट
चार महिन्यांत सोलापूर बाजार समितीतील
कांद्याची आवक व सरासरी दर प्रतिक्विंटल

- जानेवारी
आवक : १२ लाख ५० हजार १४९ क्विंटल
सरासरी दर : ८५० रुपये

- फेब्रुवारी
आवक : ९ लाख ७२ हजार १५७ क्विंटल
सरासरी दर : ८०० रुपये

- मार्च
आवक : ८ लाख ८४ हजार ५१३ क्विंटल
सरासरी दर : ६५० रुपये

- एप्रिल
आवक : ५ लाख ६९ हजार २९ क्विंटल
सरासरी दर : ६०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT