online shopping
online shopping  
पुणे

गणेशोत्सवासाठी ऑनलाइन खरेदीवर भर 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रंगबिरंगी झिरमिळ्या... कागदापासून तयार केलेले इको-फ्रेंडली मखर... विद्युत दिवे अन्‌ गणपतीच्या पूजेसाठी लागणारे विविधांगी साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकरांना ऑनलाइन संकेतस्थळांना पसंती दिली आहे. अगदी पूजेसाठी लागणाऱ्या उदबत्ती स्टॅंडपासून वॉल हॅंगिंग दिव्यांपर्यंत... आर्टिफिशल फुलांपासून फुलदाणीपर्यंत... मखराच्या अनेक व्हरायटीपासून रांगोळ्यांच्या स्टिकर्सपर्यंत... अशा वस्तू ऑनलाइन उपलब्ध असून, यंदा पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी विविध संकेतस्थळावर भर दिला आहे. 

गणेशोत्सवाच्या सजावट तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे ऍडव्हॉन्स बुकिंग काहींनी केले आहे. ऑनलाइन खरेदीवर 20 ते 50 टक्‍क्‍यांची सवलत दिली जात असून, त्यामुळे या वर्षी संकेतस्थळांमार्फत खरेदी केली जात आहे. 

सजावटीच्या साहित्यापासून बाप्पाची विविध रूपे उलगडणाऱ्या मूर्तींपर्यंत... सर्व पर्याय विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याने घरबसल्या काहींनी खरेदीचे निमित्त साधले आहे. सजावटीच्या साहित्यामध्ये झिरमिळ्या, एलईडी दिवे, पताका, फुलांच्या माळा, वॉल हॅंगिंग दिवे, फुलदाण्या, मल्टिकलर बॉल्स, डेकोरेशन स्टिकर्स, आर्टिफिशल फुले, तोरण, वॉल हॅंगिंग तोरण आणि रंगबिरंगी पडदे असे विविध प्रकार पाहायला मिळतात. पूजेच्या साहित्यामध्ये "गणेश पूजा साहित्या'चा बॉक्‍स, दिवे, धूप स्टॅंड, चौरंग, पाट अशा साहित्याबरोबरच बाप्पाच्या लहान मूर्ती आणि रांगोळीचे साहित्यही खरेदी करता येणार आहे. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने संकेतस्थळांनी ऑनलाइन खरेदीवर विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या खरेदीवर भर देत काहींनी सजावटीच्या साहित्यांचे ऑनलाइन बुकिंग केले आहे. विशेष म्हणजे एखाद्या "थीम'नुसार असणारे सजावटीचे साहित्यही ऑनलाइन उपलब्ध आहेत. 

याबाबत सोनल गजवाणी म्हणाल्या, ""संकेतस्थळावर विविध पर्याय पाहायला मिळत आहे. वॉल हॅंगिग दिवे आणि पूजेचे साहित्य ऑर्डर केले होते. त्यावर सवलतही मिळाली. हा वेगळा पर्याय असून, अनेक जण ऑनलाइन खरेदीकडे वळत आहेत.'' 

सरकारने केलेल्या प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या बंदीमुळे या वर्षी संकेतस्थळावर इको-फ्रेंडली मखर पाहायला मिळतील. कागदापासून तयार केलेल्या या मखरांमध्ये राजस्थानी मंदिरांपासून एखाद्या काल्पनिक मंदिरापर्यंत.. असे विविध प्रकारचे मखर पाहता येतील. राज सिंहासन, मयूर महाल, सुवर्ण महाल, हवा महाल, मंगलासन, नवरंग मखर, गणेश-लक्ष्मी आसन असे विविध प्रकार संकेतस्थळावर पाहायला मिळतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT