Diwali-Shopping
Diwali-Shopping 
पुणे

ऑनलाइन शॉपिंगवर तरुणाईचा भर

सकाळवृत्तसेवा

पुणे - ट्रॅडिशनल लुक देणारा घागरा असो वा क्‍लासी लुक देणारी साडी... पारंपरिक लुक देणारे कुर्ता-पायजमा विथ जॅकेट असो वा कलरफूल शेरवानी... ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर जाऊन दिवाळी शॉपिंगवर भर दिला जात आहे. घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करण्यासह ई-कॉमर्स कंपन्यांनी दिलेल्या फेस्टिव्हल ऑफर्सचाही फायदा तरुण-तरुणी घेत आहेत. त्यातच ई-कॉमर्स कंपन्यांनी विविध वस्तूंच्या खरेदीवर ७० ते ८० टक्‍क्‍यांची भरघोस सवलत दिली आहे.

दिवाळी म्हटलं की कपड्यांपासून फुटवेअरपर्यंत... दागिन्यांपासून पूजा साहित्यांपर्यंत विविध वस्तूंची खरेदी आलीच; पण बाजारात जाऊन गर्दीत खरेदी करण्यापेक्षा काहींनी ऑनलाइन शॉपिंगवर भर दिला आहे. विविध ई-कॉमर्स कंपन्यांनी खास दिवाळीसाठी फेस्टिव्हल ऑफर्स दिल्या आहेत. त्यासह एक्‍स्चेंज ऑफर्स, गिफ्ट कूपन्स आणि डिस्काउंटही दिला आहे.

दररोज सुमारे ४० हजार ऑनलाइन खरेदीचे पार्सल नियोजित ठिकाणी पोचविण्यात येत असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळाद्वारे दागिने, कपडे, फुटवेअर, सौंदर्य प्रसाधने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्‌स, मोबाईल, गृहसजावटीच्या वस्तूंसह पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे.   

याबाबत आयटी नोकरदार नीलेश देसाई म्हणाला, ‘‘घरबसल्या खरेदी करता येत असल्याने ऑनलाइन शॉपिंगवर भर दिला. कपडे आणि घरातील पूजेच्या साहित्यांची खरेदी केली. त्यावर खास डिस्काउंटही मिळाला. ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सवलत दिली आहे.’’

फेस्टिव्हल सेल सप्ताह
ई-कॉमर्स कंपन्यांनी दिवाळीनिमित्त चार ते पाच दिवसांचा फेस्टिव्हल सेल सप्ताह आयोजिला आहे. त्यात वस्तूंच्या खरेदीसाठी खास ऑफर्स दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि गॅजेट्‌सच्या खरेदीसह विविध वस्तूंवर ही सवलत दिली असून, खरेदीवर गिफ्ट कूपन्सचा लाभही घेता येत आहे.

तरुणींसाठी ट्रॅडिशनल लुक देणारे कपडे 
घागऱ्यापासून पंजाबी ड्रेसपर्यंत... साडीपासून प्लाझो कुर्त्यापर्यंत... प्रत्येकात नावीन्यतेसोबतच ट्रॅडिशनल टच असणारे कपडे ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील. ट्रॅडिशनल कपड्यांना मॅच करणारे फुटवेअरसह नावीन्यपूर्ण सौंदर्य प्रसाधनेही खरेदी करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT