पुणे

पुण्यात कोव्हॅक्सीनचे फक्त ३ हजार डोस; कोव्हीशील्ड लस संपली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शासनाकडून पुणे महापालिकेला (Pune Corporation) कोव्हॅक्सीन लसीचे ३ हजार डोस पुरविण्यात आले आहेत. ही लस ४५ च्या पुढच्या वयाच्या नागरिकांच्या फक्त दुसऱ्या डोससाठी १५ केंद्रांवर वापरली जाणार आहे. कोव्हीशील्ड (Covishield) लस संपली असल्याने त्याचे लसीकरण बंद असणार आहे. पुणे महापालिकेला उपलब्ध होत असलेल्या लस साठ्यानुसार शहरात लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी कोव्हीशील्ड लस उपलब्ध असल्याने ७८ ठिकाणी लसीकरण करण्यात आले. महापालिकेला कोव्हीशील्डचे मिळालेले २८ हजार डोस मिळाले होते, त्यानुसार गुरुवारी व शुक्रवारी लसीकरण करण्यात आले. आता पालिकेकडे उद्यासाठी (शनिवार) कोव्हीशील्ड लस उपलब्ध नाही. शासनाकडून लस मिळाली तर शनिवार व रविवारचे नियोजन केले जाईल. अन्यथा थेट सोमवारीच ही लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोव्हॅन्सीचे (covaxin) महापालिकेला ३ हजार डोस मिळाले आहेत. शनिवारी अवघ्या १५ केंद्रांवरच प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असतील. त्यानंतर रविवारी उरलेले दीड हजार डोस वापरले जाणार आहे. (Only 3000 doses of covaxin in Pune Covishield vaccine expired)

याठिकाणी होणार लसीकरण

  • कमला नेहरू रुग्णालय

  • राजीव गांधी रुग्णालय

  • नायडू रुग्णालय

  • गलांडे पाटील दवाखाना

  • संत रामदास शाळा

  • औंध कुटी

  • सुतार दवाखाना

  • बिंदू माधव दवाखाना

  • मुरलीधर लायगुडे रुग्णालय

  • छत्रपती शाहू दवाखाना

  • भानगिरे दवाखाना

  • सावित्रीबाई फुले दवाखाना

  • मालती काची दवाखाना

  • बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय

  • विलास तांबे रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT