astrophysics sakal
पुणे

खगोलभौतिकशास्त्रात ‘मास्टर’ करण्याची संधी

आयुका आणि विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम; रविवार पर्यंत मुदत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : खगोलभौतिकशास्त्रात आता थेट पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना पुण्यात उपलब्ध झाली आहे. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत रविवार (ता.२९) पर्यंत आहे.

देशात लायगो इंडिया, स्क्वेअर किलोमीटर अरे, अवकाश संशोधन आदी खगोलभौतिकीशी निगडित मोठे प्रकल्प अस्तित्वात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर खगोल आणि खगोलभौतिक शास्त्रज्ञांची येत्या काळात गरज निर्माण होणार आहे. म्हणून कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी भौतिकशास्त्रातील हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी आयुकातील शास्त्रज्ञ शिकवणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये :

- एम.एससी. फिजिक्स (अॅस्ट्रोफिजिक्स) नावाचा हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे

- सैद्धांतिक भौतिकशास्त्राबरोबरच प्रयोग आणि प्रकल्पांचा समावेश

- आयुकातील शास्त्रज्ञांच्या सानिध्यात कटिंग एड्ज’ संशोधन करण्याची संधी

- तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात प्रत्यक्ष प्रकल्पावर काम करण्याची संधी

पात्रता :

- बी.एस्सी. फिजिक्स (द्वितीय वर्षापर्यंत गणित आवश्यक), बी.टेक किंवा बी.ई.

-पदवीला ५५ टक्के गुण आवश्यक

- जॉईन्ट एन्ट्रन्स टेस्ट (जेस्ट) २०२१

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :

http://www.iucaa.in:8080/iucaa/jsp/MSc/WEB_MSc_APP_MST_FY_2021.jsp

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT