Ajit Pawar BJP Protest Pune Sakal
पुणे

Ajit Pawar : छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अजित पवारांमुळे भाजपा संतप्त

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे आता भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपा आक्रमक झाली असून पुण्यामध्ये पवारांच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे.

अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते", असं अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते, त्याचे पडसाद आता उमटत आहेत.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

नितेश राणे, चित्रा वाघ अशा भाजपाच्या काही नेत्यांनीही अजित पवार यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. चला अजित पवारांना इतिहासाचा धडा शिकवू, असं म्हणत या पोस्ट्स व्हायरल केल्या जात आहेत.

तर पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकामध्ये भाजपा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या ठिकाणी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यांचे पोस्टर्स हातात घेऊन भाजपा कार्यकर्ते जमले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT