Osmanabad and Pune Zilla Parishad organize Rice and Dal Festival mahila bachat gat Turnover of three lakh onwards pune sakal
पुणे

महिला बचत गटांच्या मालाची साडेतीन लाखांची ऊलाढाल

उस्मानाबादच्या गावरान डाळींना पुणेकरांची पसंती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठवाड्यातील उस्मानाबाद व पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवात बचत गटांच्या मालाची तीन लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. या महोत्सवात पुणे जिल्ह्यातील अकरा तर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच महिला बचत गट सहभागी झाले होते. पुण्यातील बचत गटांनी अस्सल सेंद्रीय इद्रायणी व हातसडीचा तांदूळ तर, उस्मानाबादच्या महिला बचत गटांनी गावरान डाळी विक्रीसाठी ठेवेल्या होत्या. उस्मानाबादच्या गावरान डाळींना पुणेकरांनी मोठी पसंती दाखविल्याचे पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालीनी कडू-धोटे यांनी सांगितले.

या महोत्सवात अस्सल इंद्रायणी, हातसडीचा आणि सेंद्रिय तांदूळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर आदी विविध प्रकारच्या सेंद्रिय डाळीचे स्टॉल महिला बचत गटांनी लावले होते. या महोत्सवाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (ता.१०) उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या संयुक्त विद्यमाने या तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होती. यामुसार गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या लष्कर भागातील मुख्यालयात हा आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT