पुणे

मनसे व एमआयएमला आमचा विरोध - अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

पुणे - भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भारीप-बहुजन महासंघाशी चर्चा सुरू आहे. मात्र, ‘मनसे’ आणि ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लमिनला (एमआयएम) आघाडीसोबत घेणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण पुण्यात आले होते. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे, काँग्रेसची भूमिका आणि आगामी निवडणुकांबाबत पक्षाची व्यूहरचना मांडली. 

चव्हाण म्हणाले, ‘‘निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि मनसे हे एकत्र येण्याची चर्चा आहे; परंतु आम्हाला मनसे नकोच आहे. मात्र, राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याशिवाय भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही माझी चर्चा झाली असून, ते सध्या एमआयएमसोबत आहेत. आंबेडकर काँग्रेससोबत आले तर आनंदच होईल.’’

निवडणुकीसाठी काँग्रेसकडील इच्छुकांची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, पुढील निवडणुकीत जनता या सरकारला सत्तेतून बाहेर काढणार आहे. त्यामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला.  

काकडेंचा प्रश्‍नच नाही
खासदार संजय काकडे काँग्रेसचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसचे अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे या इच्छुकांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना तिकीट देणार का, या विषयावर बोलण्यास चव्हाण यांनी टाळले. दरम्यान, पक्षातील नाराज हायकमांडकडे दाद मागू शकतात, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT