yerwada 
पुणे

मनोरूग्णालयातील स्वच्छता आता आउटसोर्स

दिलीप कु-हाडे

येरवडा: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्वच्छता ही प्रति चौरस फुटाप्रमाणे न करता ते दिवसातून तीन ते चार वेळा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी चांगल्या संस्थेची नियुक्ती करण्याची शिफारस आरोग्य विभागाला करणार असल्याची माहिती आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक नितिन बिलोलिकर यांनी दिली.

मनोरूग्णालयातील अस्वच्छतेमुळे गेल्या वीस महिन्यात तब्बल शंभरापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची दखल घेऊन आमदार जगदीश मुळिक यांनी सोमवारी दुपारी भेट दिली. यावेळी बिनोलिकर बोलत होते. यावेळी प्रभारी उपसंचालक संजय देशमुख,अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस उपस्थित होते.

बिलोलिकर म्हणाले, ‘‘ मनोरुग्णालय केवळ रुग्णालय नसून मानसिक आजारी असलेल्यांचे गाव आहे. त्यामुळे त्यांना समाजात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील विविध सण, उत्सव त्यांच्या सोबत साजरे करण्याची गरज आहे. त्यांना स्नेह,प्रेम दिल्यास ते लवकर बरे होतील.’’

‘‘रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची तपासणी केली जाते. त्यांना संसर्गजन्य रोग असल्यास त्यांना स्वतंत्र ठेवले जाते. त्यामुळे रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न आहे. कामात निष्काळजीपणा करणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.’’
-डॉ. अभिजित फडणीस, अधिक्षक, येरवडा मनोरुग्णालय

मनोरूग्णालयातील १७ रुग्ण ससूनमध्ये दाखल
मनोरुग्णालयातील १७ रुग्ण ससूनमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहेत. यातील अनेकांना किरकोळ आजारी अाहेत. मात्र धोका नको म्हणून रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर रुग्णांच्या मृत्यूदरात येरवडा अघाडीवर असून त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT