पुणे

पैनगंगेचे पाणी रिसोडच्या शेतकऱ्यांसाठी सोडा! हळद, तूर आणि फळबागा वाचविण्यासाठी अनंतराव देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे;

CD

पैनगंगेचे पाणी रिसोडच्या
शेतकऱ्यांसाठी सोडा

माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

रिसोड, जि. वाशिम : दुष्काळस्थितीत हळद, तूर आणि फळबागा जगविण्यासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी पुढे आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी पैनगंगा नदीपात्रातून रिसोड तालुक्यापर्यंत पोहोचवावे, अशी मागणी माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना (ता.९) पाठविलेल्या निवेदनात देशमुख यांनी रिसोड तालुक्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतातील पिके पाण्याअभावी सुकत आहेत. विशेषतः हळद, तूर आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्याला लागूनच रिसोड तालुका असल्याने हे पाणी पैनगंगा नदीपात्रातून पुढे सोडल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे पिके वाचविण्यासह संभाव्य आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

मात्र, पाणी सोडताना नदीकाठच्या गावांतील पूरपरिस्थितीचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर पावसाचे प्रमाण अचानक वाढल्यास रिसोड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसू शकतो. अतिवृष्टीच्या काळात या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अन्य आवश्यक वापरासाठी आरक्षित असलेला साठा अबाधित ठेवून त्याव्यतिरिक्त उपलब्ध पाणी योग्य नियोजन करून पैनगंगा नदीपात्रात सोडावे. हे पाणी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी दरात वाढ; वाहनचालकांसह घरगुती ग्राहकांना फटका

IND vs NZ 5th ODI: सुरुवातीला पडझड, मग ईशान-अक्षरची फाईटबॅक अन् सिराज-अर्शदीपच्या आक्रमक फिनिशिंगमुळे भारताच्या २०० धावा पार

Uttar Pradesh: रुग्णांची रुग्णालयांतील धावपळ थांबणार; उत्तर प्रदेशात १६ नोव्हेंबरपासून ‘ई-सारथी’ पोर्टल सुरू

Latest Marathi News Live Update : 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार

Crime: कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट! महिलेने भावांच्या मदतीने पतीचा जीव घेतला, बेदम मारहाण करत...; नालासोपाऱ्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT