पाडळीत दोन कुटुंबांत मारामारी
लोणंद, ता. २७ : पाडळी (ता. खंडाळा) येथे बुधवारी (ता. २५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणांवरून काठीने व दगडाने झालेल्या मारामारीप्रकरणी परस्पर विरोधी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार नऊ जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पाडळी (ता. खंडाळा) येथील वंदना भानुदास कचरे, भानुदास गणपत कचरे, महेश भानुदास कचरे व मनीषा गोरख गोठे (रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) यांनी आमच्या राहात्या घरासमोर गाई बांधण्याच्या ठिकाणी सरपण कोणी टाकले याबाबत शेजारच्या वंदना भानुदास कचरे यांना विचारण्यास गेले असता त्यांनी शिवीगाळ केली व त्यांचे पती भानुदास गणपत कचरे यांनी मला शिवीगाळ दमदाटी करून काठीने मारहाण केली, तसेच त्यांची मुलगी मनीषा गोरक्ष गोठे हिने माझे पती यांना मोबाईलवरून शिवीगाळ दमदाटी केली, दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा महेश भानुदास कचरे याने पुणे येथून आमच्या घरी कुऱ्हाड घेऊन येऊन मला व माझे पती यांना माझ्या आई वडिलांशी पुन्हा भांडण केले, तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद वनिता शंकर कचरे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
तर शंकर ग्यानबा कचरे, जय शंकर कचरे, वनिता शंकर कचरे, शांताबाई ग्यानबा कचरे व ग्यानबा गणपत कचरे सर्व (रा. पाडळी, ता. खंडाळा) यांनी आमच्या घरासमोर माझा पुतण्या शंकर ग्यानबा कचरे याने मला दगडाने व हाताने मारहाण केली व जय शंकर कचरे याने मला दगडाने व हाताने मारहाण केली, तसेच वनिता शंकर कचरे व शांताबाई ग्यानबा कचरे यांनी देखील मला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर ग्यानबा गणपत कचरे हा हातात दगड घेऊन तेथे आला व त्याने मला शिवीगाळ दमदाटी केल्याची वंदना भानुदास कचरे (वय ५०, रा. पाडळी, ता. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार श्री. टेकवडे व श्री. सोनवलकर हे अधिक तपास करत आहेत.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.