palkhi
palkhi 
पुणे

व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पालखी सोहळा

राजकुमार थोरात

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पालखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सोमवार (ता.२३) रोजी आषाढी एकादशी आहे. पुणे जिल्हातुन ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज यांच्यासह अनेक संताचे पालखी सोहळे पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. जिल्हातील शाळांमध्ये आषाढी एकादशी चे औच्युत साधुन  चिमुरड्या मुलांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. कळंब मधील व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील मुला-मुलींनी एकात्मता, सामाजिक बांधीलकी, पर्यावरण रक्षण यांची जनजागृती केली. पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालखी सोहळ्यासाठी  विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. दिंडी सोहळ्यानंतर रिंगण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मुला-मुलींनी व्यसनमुक्तीचा संदेश देवून समाजजागृती केली. 

कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री संदिप पानसरे, सारिका पानसरे, निलम डोबांळे ,अनिता भाटिया, नितीन सोरटे, रज्जाक अत्तार,समीर पठाण, अनिल तांबे उपस्थित होते.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT