परप्रांतीय कामगारांची नोंदणी करा
पाचगणीत विविध संघटनांचे पोलिसांना निवेदनाद्वारे साकडे
पाचगणी, ता. २७ : पाचगणी व परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने परप्रांतीय कामगारांची पोलिस नोंदणी व चारित्र्य पडताळणी अनिवार्य करावी, या मागणीचे निवेदन विविध संघटनांच्या वतीने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या सातारा जिल्हा शाखेने पुढाकार घेऊन ही मागणी लावून धरली आहे.
जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे, हॉटेल, लॉजिंग आणि शाळांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी परराज्यातून कंत्राटदारांमार्फत मोठ्या संख्येने मजूर दाखल होत आहेत. यामध्ये महिला, वृद्ध आणि बालकामगारांचाही समावेश आहे. मात्र, या मजुरांची कोणतीही लेखी माहिती स्थानिक पोलिस ठाणे किंवा पोलिस पाटलांकडे उपलब्ध नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी निश्चित करणे कठीण जाईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
कामासाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कायमचा व सध्याचा पत्ता, संपर्क क्रमांक, भाडेकरार आणि कामाचे स्वरूप याची कायदेशीर नोंद करणे बंधनकारक करावे. जे कंत्राटदार कामगारांची माहिती लपवतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पाचगणीचे स्थैर्य आणि शांतता टिकवण्यासाठी कामगारांची पोलिस पडताळणी ही काळाची गरज असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
याप्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अभिजित (सनी) ननावरे, कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष नितीन वन्ने, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, संजय वन्ने, वैजनाथ प्रभाळे, सुमीत प्रभाळे, शुभम ननावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------------- ---
07344
पाचगणी : दिलीप पवार यांना निवेदन देताना अभिजित ननावरे, नितीन वन्ने, ऋषिकेश वायदंडे आणि इतर. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.