pandharinath pathare will donate prize money to cm relief fund
pandharinath pathare will donate prize money to cm relief fund 
पुणे

पंढरीनाथ पठारेंचा निर्णय; शिवछत्रपती पुरस्काराची रक्कम 'येथे' देणार देणगी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुरस्कार विजेते पंढरीनाथ पठारे यांनी दिली. त्यांच्या या निर्णयाचं केवळ कुस्तीच नव्हे तर, संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.

यासंदर्भात पुरस्कार विजेते पंढरीनाथ पठारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, राज्यातील कुस्ती क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी राज्य सरकारचा मनःपूर्वक ऋणी आहे या सन्मानामुळे कुस्ती क्षेत्राच्या विकासाची काम करण्यासाठी मला अधिक बळ मिळाले असून माझ्या वाढलेल्या जबाबदारीची मला जाणीव आहे. आजवर अनेक गुणवान कुस्तीपटूंना मार्गदर्शन करून त्यांना घडविण्याचे काम मला करता आले, याचा मनस्वी आनंद आहे, पठारे यांनी सांगितलं.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

माझ्या देहात प्राण असेपर्यंत कुस्ती क्षेत्राची सेवा यापुढेही अविरतपणे आणि निष्ठेने चालू ठेवण्याचा माझा निर्धार आहे. कुस्ती क्षेत्रातील अनेक खेळाडूंना घडविण्यासाठी मार्गदर्शकांसोबतच त्यांच्यातील गुण विकासासाठी मी प्रयत्न करीत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मला पुरस्कारासोबत मिळत असलेली तीन लाख रुपये इतकी रक्कम राज्यातील गरजूंच्या मदतीकरिता मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द करीत असल्याचे पठारे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT