पुणे

दलित महासंघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

CD

PNE26V98667
पंढरपूर : शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटपप्रसंगी लक्ष्मण शिरसट, रमेश कांबळे, विनायक संगीतराव, समाधान घाडगे, किशोर जाधव आदी.
---
दलित महासंघाच्या वतीने
शालेय साहित्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २४ : संत गाडगेबाबा जयंती आणि दलित महासंघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नगरपालिका मराठी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. २४) शालेय साहित्य व दप्तर मोफत वाटप करण्यात आले. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या पुढाकारातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील लोकमान्य विद्यालयात दप्तर वाटपाचा कार्यक्रम झाला. नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व नूतन नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. नगरपालिकेत शिकणाऱ्या मुलांना कोणतीही शैक्षणिक उणीव भासू दिली जाणार नाही. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमास नगरसेवक विनायक संगीतराव, प्रियांका तारापूरकर, सुनील डोंबे, किशोर जाधव, सागर तारापूरकर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक आराध्ये, केंद्रप्रमुख तानाजी बोड्रे, मुख्याध्यापक समाधान घाडगे आदींसह पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT