पुणे

पंढरपूर दि.4 मार्च पंढरपूरातून जाणारी जड वाहतुक बंद करावी भाजपाचे पोलीसांना निवेदन

CD

PNE26W01179
पंढरपूर : शहरातून जाणारी जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देताना विक्रम शिरसट, नगरसेवक सौरभ थिटे आदी.
---
पंढरपूर शहरातील जड वाहतूक बंद करा
अपघात, वाहतूक कोंडीमुळे भाजपचे पोलिस निरीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ६ : शहरात वाढते यात्रेकरू, वारकरी व वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. त्यातच शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येत असून, अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. ही जीवघेणी वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट व नगरसेवक सौरभ थिटे यांनी शहर पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
शहरातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच एका टिपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहतुकीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी भाजपने दिलेल्या निवेदनात केली आहे.
जड वाहतूक टाळण्यासाठी शहराबाहेर बाह्यवळण रस्ता असला तरी त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक तो टाळून शहरातूनच वाहने नेतात. दहा ते चौदा चाकी ट्रक तसेच तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूकही शहरातूनच होत असल्याने अपघात आणि कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. या जीवघेण्या वाहतुकीकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
---
चौकट :
शहर पोलिस स्थानकाअंतर्गत स्वतंत्र वाहतूक शाखा असून, शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी या शाखेवर आहे. मात्र, वाहतूक पोलिस शहरात कमी दिसतात, तर शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांकडून ‘एंट्री’ वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. अशाच वसुलीच्या वादातून एका वाहनचालकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे ही वसुली थांबवून शहरातील जड वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT