पुणे

पंढरपूर येथे पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन

CD

KRK26B03803, KRK26B03804, KRK26B03805, KRK26B03807
अनुजा झोकरकर २) पं.शौनक अभिषेकी, ३) पं.रामदास पळसुले ४) सारंग कुलकर्णी

पंढरपुरात पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन
पं.शौनक अभिषेकी, पं.रामदास पळसुले, सारंग कुलकर्णी, अनुजा झोकरकर यांची उपस्थिती

करकंब, ता. २४ : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी सदैव कार्यरत असलेल्या करकंब येथील नादब्रह्म कला फाउंडेशन व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी दोन दिवसीय पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नादब्रह्मचे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी दिली.
भक्ती मार्गावरील आरती मंडप प्रांगणात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या संगीत महोत्सवाचे उद्‍घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक, हभप राणा महाराज वासकर, पंडित शौनक अभिषेकी, भगवान मनमाडकर, शुभांगी मनमाडकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पहिल्या दिवशी (शनिवारी) उदयोन्मुख गायक राज शहा व अनुजा झोकरकर यांचे गायन तर पंडित पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकर यांचे शिष्य पंडित रामदास पळसुले यांचे एकल तबलावादन होणार आहे. दुसऱ्या दिवशी (रविवारी) करण देवगावकर यांचे गायन व सारंग कुलकर्णी यांचे सरोदवादन होणार आहे. त्यानंतर पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.
या सर्व कलाकारांना अजिंक्य जोशी, कार्तिक स्वामी, माऊली खरात (तबला), यश खडके, सारंग कुलकर्णी, ओंकार पाठक (हार्मोनिअम), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज) व माऊली पिसे, सुदर्शन कुंभार (टाळ) यांची साथसंगत लाभणार आहे. ध्वनी व्यवस्था आरती साऊंड सिस्टीम यांची असणार आहे.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कलासाधकास देण्यात येणारा (स्व.) नारायण पंढरीनाथ दुधाणे संगीत सेवा सन्मान पुरस्कार रामदास नाना रोंगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT