Para Sports 2025 Pune event for Divyang athletes esakal
पुणे

Para Sports 2025 Pune: पुण्यात पॅरा स्पर्धा; दिव्यांग खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

Divyang Athletes Opportunity : पुण्यात ११-१८ ऑगस्ट दरम्यान ‘खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५’ मध्ये ६०० हून अधिक दिव्यांग खेळाडू भाग घेणार असून दुबई विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिव्यांग खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी ‘खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५’ या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा ११ ते १८ ऑगस्ट दरम्यान म्हाळुंगे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथे होतील.

भारतीय पॅरालिम्पिक समिती, एजीसी स्पोर्ट्स, पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन यांच्यातर्फे, तसेच पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने या स्पर्धा होतील. यामध्ये पॅरा नेमबाजी, जलतरण, ॲथलेटिक्स व व्हीलचेअर बास्केटबॉल हे खेळ आहेत.

या स्पर्धेत टोकियो व पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेती अवनी लेकरा, कांस्यपदक विजेती मोनो अग्रवाल, रुबिना फ्रान्सिस यांच्यासह १३ पॅरालिम्पियन ५० आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेतून दुबई येथे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘अल- इन दुबई’ पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, अशी माहिती पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर, आयोजक आकाश कुंभार, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप आणि संचालक अजय जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT