Parade for the first time on the occasion of Dasara in Kedgaon
Parade for the first time on the occasion of Dasara in Kedgaon 
पुणे

केडगावात संघाचे दसऱ्यानिमित्त प्रथमच पथसंचलन

रमेश वत्रे

केडगाव (जि.पुणे) : केडगाव (ता.दौंड ) येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्यानिमित्त पथसंचलन झाले. संघाने येथे प्रथमच संचालनाचे आयोजन केले होते. संचलनात सुमारे 200 स्वयंसेवकांनी भाग घेतला. पथसंचलनाचे नेतृत्व रोहित ताम्हाणे यांनी केले. 

संघाचे ज्येष्ठ प्रशिक्षक रघुवीर पाटसकर, तालुका कार्यवाह प्रशांत खादगे, सहकार्यावाह बापू खेत्रे, संजय गायकवाड, सखाराम शिंदे, शेखर दुधांडे, धीरज भळगट, अप्पासाहेब टेंगले, शाम ताकवणे, विठ्ठल शेळके, रवींद्र दोरगे, डॅा.ज्ञानदेव शेळके, डॅा.नीलेश लोणकर, राहुल बारवकर आदी उपस्थित होते. केडगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शिलोत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. 

संघाचे ज्येष्ठ प्रशिक्षक रघुवीर पाटसकर म्हणाले, 1925 रोजी विजयादशमीला डॉ. केशवराव हेडगेवार यांनी पाच स्वयंसेवकांना घेऊन संघाची स्थापना केली. आज जगात 140 देशात संघाच्या शाखा चालतात. समाजात देशभक्ती जागवायची आणि समाजाला एकत्र आणायचे यासाठी संघाची स्थापना झाली. का एकत्र यायचे, का संचलन करायचे तर कार्य अजूनही अपुरे आहे. देशात अजूनही फुटीरतावादी लोक कमी नाहीत. राज्य घटनेवर विश्वास ठेऊन हा देश सामर्थ्यशाली कसा होईल, राज्य घटनेची सर्व तत्व अमलात कशी येतील याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक भारतीय सुखा समाधानाने व सामर्थ्यशिलतेने जीवन जगला पाहिजे हे संघाचे ध्येय आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT