पुणे

#ParkingIssue पक्षकार, वकील पार्किंगअभावी त्रस्त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयात विविध खटल्यांच्या कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना व पक्षकारांना सध्या पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयातील वकिलांनी काही उपयोजना सुचविल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही या प्रश्‍नावर मार्ग निघाला नाही. 

बेकायदा नोकरीवरून काढणे, पगार वाढ, बोनस आणि कामगार व कंपन्यांतील संघर्ष, असे विविध वाद सोडविण्यासाठी दररोज वकील व हजारो पक्षकार या ठिकाणी येत असतात. मात्र दावा दाखल करण्यापूर्वी त्यांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत असल्याचे चित्र आहे. इमारतीजवळ चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी स्वतंत्र जागाच नाही. त्यामुळे त्यांना चारचाकी वाहने कुठे उभी करायची, हा प्रश्‍न पडत आहे. वकील न्यायालयाच्या इमारती शेजारी असलेल्या पोलिस वसाहतीत आपली चारचाकी वाहने उभी करत असतात. मात्र संबंधित ठिकाणी आता पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असल्याने वकिलांना देखील आता पार्किंगची समस्या भेडसावत आहे. न्यायालयाच्या इमारतीसमोर सुमारे 80 दुचाकी लावता येतील एवढी जागा आहे. मात्र या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ही जागा अत्यंत कमी आहे. त्यातच आता याठिकाणी पुणे महापालिकेकडून  काही विकासकामे करण्यात येत आहे. यामुळे पार्किंगचा प्रश्‍न आणखी गंभीर झाला आहे. 

न्यायालयाच्या परिसरात दुचाकी वाहनांसाठी थोडीशी जागा इमारतीच्या खाली उपलब्ध आहे. मात्र चारचाकी वाहने कुठे लावायची, असा प्रश्‍न वकील व पक्षकारांना दररोज पडत आहे. त्यामुळे पार्किंगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी प्रशासनाकडे वारंवार केली जात आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. 
- ऍड. आदित्य जोशी, अध्यक्ष, लेबर लॉ प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT