Airport-Parking-Policy
Airport-Parking-Policy 
पुणे

विमानतळासाठी ‘पार्किंग पॉलिसी’

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी विमानतळावरील ‘पार्किंग लॉट्‌’स स्वयंचलित करण्यात येणार आहेत. नव्या पॉलिसीमध्येही प्रवाशांना विमानतळाच्या आवारात मोफतच ‘पिकअप-ड्रॉप’ करता येणार आहे. व्यावसायिक वापराच्या वाहनांतील प्रवाशांना मात्र ‘पिकअप-ड्रॉप’साठी पैसे मोजावे लागणार आहेत.

विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १७) झाली. त्यात पार्किंग पॉलिसीची मंजुरी, सौरऊर्जा क्षमतेत वाढ, कार्गो सेवेचे विस्तारीकरण, नव्या इमारतीची उभारणी, विमानतळाच्या परिसरातील जोड रस्ते आदींबाबत चर्चा झाली. 

या प्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष प्रदीप भार्गव, समितीचे उपाध्यक्ष आणि आमदार जगदीश मुळीक, विमानतळाचे संचालक अजय कुमार तसेच हवाई दल, जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पोलिस, विमान वाहतूक कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. 

अजयकुमार यांनी या वेळी विमानतळ विस्तारीकरणातंर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. लोहगाव विमानतळावर सौरऊर्जेचा ३०० किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. येत्या दोन महिन्यांत त्याची क्षमता आणखी शंभर किलोवॉटने वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विमानतळाच्या जोड रस्त्यांबाबत येत्या एक महिन्यांत स्वतंत्र बैठक घेण्याचे या वेळी ठरले.

तर विमानतळावरील नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. पार्किंग लॉट्‌सवरील स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाहनचालकांना तिकिट मिळेल व त्यानुसार शुल्क आकारणी होईल.

विमानतळावरील पायाभूत सुविधांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. प्रवासी संख्याही वेगाने वाढत असून; त्यानुसार विमानांची संख्या वाढत आहे. नव्या इमारतीचे  काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ते पूर्ण झाल्यावर अवघ्या दोन वर्षांत पुणे विमानतळ आंतरराष्ट्रीय नकाशावर चमकेल. 
- अजयकुमार, विमानतळ संचालक

विमानतळावर झालेले बदल 
  चेक इन काउंटरची संख्या २९ वरून ५३ वर 
  आसनव्यवस्थेची क्षमता ६५० वरून १९६० वर 
  लगेज ट्रॉली पूर्वी ४०० होत्या; आता त्या ७०० झाल्या आहेत 
  बोर्डिंग गेट्‌स पूर्वी ६ होते आता त्यांची संख्या ९ झाली आहे 
  विमानतळाच्या आवारात ग्रीन बेल्ट विकसित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT