daund
daund 
पुणे

अवयव दान संकल्पात सहभागी व्हा : प्रमोद जेजुरीकर 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : अवयव दानामुळे मरणानंतर अवयव स्वरूपात जिवंत राहण्याप्रमाणेच गरजुंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळते. अवयव दान ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया झाली पाहिजे. त्याकरिता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पुढाकाराने ९ ऑगस्ट रोजी आयोजित अवयव दानाचा ऑनलाइन संकल्प करण्यासह इतरांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर यांनी केले आहे.   

दौंड शहरात रोटरी क्लब ऑफ दौंडच्या नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ प्रमोद जेजुरीकर यांच्या हस्ते पार पडला व त्या वेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. सहायक प्रांतपाल संजय दोशी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह हरेश रांभिया, सविता भोर, मनोहर बोडखे, प्रमोद खांगल, आदी या वेळी उपस्थित होते. 

प्रमोद जेजुरीकर म्हणाले, ``ज्या रुग्णाचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहे, अशा रुग्णांसाठी अवयव दान हाच एक आशेचा किरण आहे. मृत्यूनंतर मानवी शरीरातील उपयुक्त आणि सक्षम अवयव दान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. अवयव दान व देहदान यामध्ये फरक असून देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ठेवून घेतले जाते. साक्षरता, पोलिओ निर्मुलन, स्वच्छता, आदी क्षेत्रात रोटरीचे जगभरातील बारा लाख सदस्य दोनशे देशांमध्ये सक्रियपणे समाजसेवा करीत आहेत. 

रोटरी क्लब ऑफ दौंडचे सन २०१८ - २०१९ साठीचे नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : - अध्यक्ष - मनोहर बोडखे, सचिव - प्रमोद खांगल, संचालक - राम दावरा, दिव्या मूलचंदानी, शैलजा लोणकर, डॅा. फिलोमन पवार, अविनाश हरहरे, सुशील शहा, जीवराज पवार, नीलम मेवानी, प्रज्ञा राजोपाध्ये, शालिनी पवार , डॅा. विनोद पोखरणा, डॅा. मुकुंद भोर, प्रफुल्ल भंडारी, पल्लवी कुलकर्णी, हरेश रांभिया, सायली शहा, डॅा. प्रा. संजय इंगळे.

अवयव दानाचा आॅनलाइन संकल्प ...
पुणे व रायगड जिल्ह्यातील रोटरी क्लब्सच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी www.giftlife.co.in या संकेतस्थळावर ज्यांना अवयव दानाचा करावयाचे आहे त्यांनी संकेतस्थळावरील अर्ज सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान भरावयाचा आहे. अवयव दानाचा संकल्प केल्यानंतर त्यासंबंधी माहिती अर्ज भरणार्या जवळच्या नातेवाईकांना संदेशाद्नारे दिली जाणार आहे. प्रादेशिक प्रत्यारोपण समन्व्य केंद्र (झेडटीसीसी) संकेतस्थळावरील माहितीचे संकलन करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT