Railway
Railway 
पुणे

बाद तिकिटांचा रेल्वे प्रवाशांना फटका

सकाळ वृत्तसेवा

दौंडला ३९ जणांना उतरवले; अनधिकृत एजंटांची आरक्षणे केली रद्द
पुणे - रेल्वेच्या अनधिकृत एजंटमुळे पुणे-दानापूर एक्‍स्प्रेसमधून जबलपूरला निघालेल्या ३९ प्रवाशांना दौंडमध्येच प्रवास थांबवावा लागला. आयआरसीटीसीने या प्रवाशांची तिकिटे बाद ठरवल्यामुळे त्यांना रेल्वेतून मध्येच उतरावे लागले.

याबाबतची माहिती अशी की, पुणे-दानापूर एक्‍स्प्रेसमधून (गाडी क्र. १२१४९) शनिवारी (ता. ३०) ३९ प्रवासी जबलपूर येथे तीर्थयात्रेसाठी निघाले होते. प्रवाशांच्या या ग्रुपने एकूण ४२ जणांचे एका खासगी एजंटाकडून आरक्षण करून घेतले होते. त्यातील तिघांना बरे वाटत नसल्याने ४२ पैकी ३९ प्रवासी जबलपूरला जाण्यासाठी पुणे स्टेशनवर आले होते. शनिवारी रात्री आठ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी सुटली. त्यांना बी-१ आणि बी-५ डब्याचे आरक्षण मिळाल्याचे एजंटने सांगितले; तसेच त्यांना बर्थ क्रमांकही दिले होते. आरक्षणाचा कागद संबंधित एजंटने त्यांना दिला होता. मात्र, प्रवासाला सुरुवात केली तेव्हा तिकिटे आयआरसीटीसीने सीझ करीत ती बाद ठरवल्याचे समजले. तिकिटे बाद ठरवून दुसऱ्या प्रवाशांना ते बर्थ दिल्याने ३९ प्रवाशांचा व बर्थ अलॉट केलेल्या प्रवाशांबरोबर वादावादी झाली. त्यामुळे टीसीने मध्यस्थी करत ३९ प्रवाशांना दौंड येथे खाली उतरण्याची विनंती केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी रेल्वेतून उतरणे पसंत केले. त्यानंतर बसने इच्छित स्थळ गाठले.

प्रवासी संजय शहा म्हणाले, ‘‘तिकीट बाद ठरविल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले. मात्र, त्याबाबतचा एसएमएस आला नाही. अनधिकृत एजंटचा भुर्दंड आम्हाला सोसावा लागला. रेल्वेने प्रवास शक्‍य नसल्याने आम्ही अडीच लाख रुपये भरून खासगी व्हॉल्वो बस आरक्षित केली. रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे पैसे परत द्यावेत, अशी आमची मागणी आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT