online-bill-pay
online-bill-pay 
पुणे

इवॉलेटद्वारे वीजबिल भरा अन् 5 रुपये कमिशन मिळवा...

सकाळ वृत्तसेवा

बारामती : वीजबिल इवॉलेटद्वारे भरल्यास "महावितरण'ने प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यास सुरवात केली असून, शहरी व ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची ही एक संधी आहे. बारामती परिमंडलातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात व बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, भोर तालुक्‍यात ठिकठिकाणी महावितरणकडून या वॉलेटची नोंदणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महावितरणने वीजबिलाचा भरणा करण्यासाठी मोबाईल ऍपसह ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या आदेशानुसार महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट आणले आहे.

या वॉलेटद्वारे वीजग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणा दुकान आदी छोटे- मोठे व्यावसायिक, बचत गट, महावितरणचे वीजबिल वाटप व रीडिंग घेणाऱ्या संस्थांना ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येईल. 
कशी आहे वॉलेट पद्धत? 
वॉलेट नोंदणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज असून त्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालय अर्जदाराच्या अर्जाची व जागेची पडताळणी करेल. त्याकरिता कोणतेही शुल्क नाही; मात्र संबंधित वॉलेटधारकाला सुरवातीस किमान 5 हजार रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 1 हजार रुपयांच्या पटीत तो रिचार्ज वाढविता येईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबॅंकिंगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे.

वॉलेट रिचार्ज केल्यानंतर वॉलेट ऍपमधून महावितरणच्या वीजग्राहकांच्या वीजबिलाची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जाईल. विशेष म्हणजे एका वॉलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT