hirkani
hirkani 
पुणे

कार्यालयांतील "हिरकणी' दुर्लक्षितच 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला स्तनपानासाठी 60 बाय 60 च्या स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण सरकारने 2012 मध्ये आखले. मात्र, या आठ वर्षांत सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. महापालिकेतही हा कक्ष नसल्याचे पुढे आले आहे. 
सरकारी कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नोकरदारांची लाखावर संख्या आहे; परंतु तेथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. विशेषत: एसटी महामंडळाने सर्व स्थानकांवर हा कक्ष उभारला. मात्र, अनेक स्थानकांवर तो दुर्लक्षित झाल्याचे दिसून येते. शहरातील अनेक सरकारी व खासगी कार्यालये, वर्दळीच्या ठिकाणी ही संकल्पना अद्यापही रुजली नसल्याने कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना आणि कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. 

काय आहे परिपत्रकात 
स्तनदा माता आणि बाळांचे आजार यावर मात करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने हिरकणी कक्ष ही संकल्पना पुढे आणली. आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंबकल्याण कार्यालय-पुणे यांच्या माध्यमातून यासंबंधात परिपत्रक काढले. त्यानुसार हा कक्ष कसा असावा, त्याची ठेवण कशी व्हावी, त्या खोलीत काय असावे, याबाबत मार्गदर्शक सूचना, वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा देण्याची तरतूद परिपत्रकामध्ये केली आहे. 

जनजागृतीचा अभाव
हिरकणी कक्ष योजनेसंदर्भात योग्य जाहिरात आणि प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखांना वेळीच सूचना करणे आवश्‍यक आहे. अनेक अधिकाऱ्यांना हिरकणी कक्षाची माहिती नाही. ज्यांना माहिती आहे ते याकडे उदासीनतेने पाहत असल्याची खंत माता दुग्धपेढीच्या प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी व्यक्त केली. 

कक्षाचा फायदा 
आईने बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघर असणे, या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. बालकाच्या जीवनातील पहिले तीन वर्षे महत्त्वाची असल्याने त्याची शारीरिक व बौद्धिक विकासासाठी स्तनपान गरजेचे आहे. त्यासाठी या कक्षाचा आधार मिळू शकतो, असे मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी व्यक्त केले. 

येथे नाही सुविधा 
आयकर विभाग, जीएसटी, पीएफ कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, पीसीएनटीडीए, पोस्ट कार्यालय, महापालिका, महावितरण, महापालिका आरोग्य विभाग. 

नोटीस नाहीच
सरकारी कार्यालयांत हिरकणी कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जेथे याची अंमलबजावणी झाली नसल्यास "कारणे दाखवा'ची नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे निर्देश महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. 

याबाबत सरकारचे आदेश आहेत; परंतु जागेअभावी करता आले नाही. महापालिका भवनात जागा उपलब्ध झाल्यावर हिरकणी कक्षाची उभारणी करता येईल. 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT