firing
firing 
पुणे

पिंपरीच्या महापौरांकडून पवनानगरमध्ये गोळीबार? 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण परिसरात पिस्तुलातून गोळीबार केल्याची पवनानगर आणि पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा आहे. दरम्यान, मी गोळीबार केलेला नसून, पावसात भिजल्याने केवळ पिस्तूल साफ केले,' असे महापौर जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरण शंभर टक्के भरल्याने महापौर जाधव यांनी सपत्निक जलपूजन केली. या वेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह काही पत्रकार व अधिकारी उपस्थित होते. जलपूजनानंतर सर्वजण धरणालगतच्या ठाकूरसाई परिसरातील एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले. भोजन झाल्यानंतर महापौर जाधव यांनी नवीन पिस्तूल काढले. मित्रांना दाखवून त्याबाबतची माहिती दिली. हास्यविनोद सुरू असताना दोनवेळा हवेत फायर केल्याने खळबळ उडाली. 

पिस्तूल साफ केले, फायर नाही : महापौर 
जलपूजनाच्या कार्यक्रमामुळे मी पावसात भिजलो होतो. माझे पिस्तूल कमरेला होते. त्याचा परवाना आहे. पिस्तूलही भिजलेले होते. ते मी साफ करीत होतो. त्या वेळी काही पत्रकारांनी फोटो घेतले आणि फायरिंग केल्याचे खोटे वृत्त पसरविले. मी गोळीबार केलेला नाही. परवान्यानुसार मला "बुलेट राउंड' मिळालेल्या आहेत. त्या तशाच आहेत. फायर केले असते तर "राउंड' कमी राहिले असते, असे महापौर राहुल जाधव यांनी "सकाळ'ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT