पुणे

एमआयडीसीतील रस्त्यांच्या  कामांना मुहूर्त

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण वेगात सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त होत असून, त्यांच्या सौंदर्यात भरही पडणार आहे. 

शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीचा विस्तार झालेला आहे. भोसरी ते निगडी टेल्को रस्ता त्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. त्याशिवाय अंतर्गत चार मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी सांडपाणी वाहिन्या टाकून रुंदीकरण व डांबरीकरण सुरू आहे. तसेच, दोन्ही बाजूला पदपथ तयार करून एलईडी पथदिवे व विविध झाडे लावण्याची कामेही सुरू आहेत. 

मटेरियल गेट रस्ता
टेल्को रस्त्यावरील यशवंतनगर चौक ते स्पाइन रस्त्यावरील राजमाता जिजाऊ चौक रस्ता हा टाटा मोटर्स मटेरियल गेट रस्ता नावाने ओळखला जातो. यामुळे भोसरी आणि पिंपरी एमआयडीसी जोडल्या आहेत. या रस्त्यावर भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकून रुंदीकरण झाले आहे. दोन्ही बाजूंना पदपथ करून सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यावर अनेक कंटेनर उभे असतात. रहदारीही वाढलेली आहे. मात्र, अरुंद व खड्डेमय रस्ता आणि कंटेनरच्या रहदारीमुळे वारंवार कोंडी होत होती, त्यातून आता सुटका होणार आहे. 

स्पाइन सिटी रोड 
टेल्को रस्त्यावरील गवळी माथा चौक ते स्पाइन रस्ता व आरटीओ कार्यालय यांना जोडणाऱ्या रस्त्याला स्पाइन सिटी रोड नावाने ओळखले जाते. भोसरी एमआयडीसीतील हा महत्त्वाचा अंतर्गत मोठा रस्ता आहे. त्यामुळे एमआयडीसीतील अन्य छोटे रस्ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या असून रस्ता रुंदीकरण व खडीकरण प्रगतिपथावर आहे. पूर्वी अरुंद असलेला हा रस्ता आता प्रशस्त झाला आहे. त्यात दुभाजक असल्याने रहदारीस सुरक्षित आहे. 

इंद्रायणीनगर, शांतीनगर रस्ता
टेल्को रस्त्यावरील सेंच्युरी एन्का कंपनी ते भोसरी प्राधिकरणातील इंद्रायणीनगर आणि सेक्‍टर सात व दहा यांना जोडणाऱ्या रस्त्याचेही काम सध्या सुरू आहे. दोन्ही बाजूला सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच, लांडेवाडी झोपडपट्टी ते शांतीनगर यांना जोडणाऱ्या रस्त्याचेही रुंदीकरण सध्या सुरू आहे.

एमआयडीसीतील रस्त्यांची कामे चार वर्षांपासून रखडलेले होते. आता रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, मोठ्या रस्त्यांसह अंतर्गत छोट्या रस्त्यांचीही डागडुजी करून डांबरीकरण करणे गरजेचे आहे. छोट्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचीही मागणी गेल्या चार वर्षांपासून आम्ही करीत आहोत. 
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT