PDCC Bank sakal
पुणे

पुणे जिल्हा बँक निवडणुक; राष्ट्रवादी कॉंग्रेसने विद्यमान नऊ संचालकांना दिला डच्चू

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पक्षाच्या विद्यमान नऊ संचालकांना डच्चू दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पक्षाच्या विद्यमान नऊ संचालकांना डच्चू दिला आहे. डच्चू दिलेल्यांपैकी दोन संचालकांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यामुळे हे दोन संचालक वगळता उर्वरित सात जणांना राष्ट्रवादीने बॅंकेची उमेदवारी नाकारली आहे. दरम्यान, विद्यमान आठ संचालकांना पुन्हा एकदा पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय दहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

नव्याने संधी देण्यात आलेल्या दहा जणांपैकी दोघा जणांना एक किंवा दोन कार्यकाळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा उमेदवारी दिली असून, उर्वरित आठ जणांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शुक्रवारी (ता.१०) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे अधिकृत पॅनेल जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा बॅंकेची उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान संचालकांमध्ये विद्यमान उपाध्यक्षा अर्चना घारे (मावळ), निवृत्तिअण्णा गवारे (शिरूर), बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी), तुळशीराम भोईर, वर्षा शिवले (शिरूर) आणि भालचंद्र जगताप (भोर) आदींचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील प्रकाश म्हस्के यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे पक्षाचा अन्य अधिकृत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे येथून म्हस्के आणि विकास दांगट या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

उमेदवारी मिळालेले विद्यमान संचालक

- अजित पवार

- दिलीप वळसे पाटील

- दत्तात्रेय भरणे

- रमेश थोरात

- रेवणनाथ दारवटकर

- प्रा. दिगंबर दुर्गाडे

- संजय काळे

- दिलीप मोहिते

नव्याने संधी दिलेले चेहरे

- ज्ञानोबा (माऊली) दाभाडे

- अशोक पवार

- सुनील चांदेरे

- रणजित निंबाळकर

- सुरेश घुले

- प्रवीण शिंदे

- संभाजी होळकर

- दत्तात्रेय येळे

- पूजा बुट्टे पाटील

- निर्मला जागडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT