pdcc bank sakal
पुणे

PDCC Bank : शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज वाटप सुरु; सर्व पात्र शेतकऱ्यांना देणार कर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्हा बॅँकेने खरिपासाठी सुमारे २ हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात हेच उद्दिष्ट एक हजार आठशे कोटी रुपयांचे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात सुमारे एक हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हा बँकेतून सोमवारी (ता.१५) सांगण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यानुसार दरवर्षी १एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत खरीप हंगामातील पिकांसाठी तर, १ आक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत रब्बी हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यात येते. खरीप पिकांसाठी वाटप केले जाणारे पीककर्ज हे अल्प मुदतीचे असते.

त्यामुळे दरवर्षी ३१ मार्चपर्यंत या कर्जाची परतफेड करणे बंधनकारक असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळत असतो. शिवाय हेच शेतकरी पुढे नवीन वर्षातील खरीप हंगामातील पिकांसाठी कर्ज घेण्यास पात्र ठरत असतात, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT