पुणे

#SpeedControl नव्या ‘स्पीडगन’द्वारे  दंडाची नवी मात्रा

मंगेश कोळपकर

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधाव जात असाल, तर आता काळजी घ्या, कारण आधुनिक स्पीडगन तुमच्यावर कंट्रोल करणार आहे. त्याचबरोबर मोटार वाहन कायद्यातील नव्या दुरुस्तीनुसार वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास तब्बल एक हजार रुपये दंड वसूल करण्यास दोन दिवसांपासून सुरवात केली आहे. त्यामुळे नव्या स्पीडगनमुळे दंड वसूल करण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा अद्ययावत झाली आहे. 

द्रुतगती मार्गावर वाहने भरधाव जातात आणि त्यामुळे वारंवार अपघात होतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वेग मर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने महामार्ग पोलिसांना पुन्हा नव्याने स्पीडगन दिल्या आहेत. पूर्वीपेक्षा या गन आधुनिक स्वरूपाच्या आहेत. भरधाव जाणाऱ्या वाहनाचा वेग, क्रमांक, अंतर टिपून त्याची प्रिंट आउट लगेचच बाहेर पडते. त्यानुसार महामार्ग पोलिस ती प्रिंट आउट खालापूर किंवा उर्से टोलनाक्‍यावरील पोलिस पथकाच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पाठवतात. संबंधित वाहन टोलनाक्‍यावर आले, की पोलिस त्यांना प्रिंटआउट दाखवून, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल किमान १००० रुपये दंड वसूल करतात. 

येथे आहेत स्पीड गन 
वडगाव, खंडाळा, बोरघाट आणि पळसपे  

द्रुतगती मार्गासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पीडगन आता उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा वापर करून दंडाच्या नव्या तरतुदीनुसार कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. त्याची दखल घेऊन वाहनचालकांनी नियंत्रित वेगाने वाहन चालविणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. 
- दत्तात्रेय गाढवे, पोलिस निरीक्षक, द्रुतगती मार्ग, महामार्ग पोलिस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT