पुणे

आश्चर्यम्! शिधाकिटची मागणी करणारेच दारुसाठी रांगेत उभे

विजय जाधव

भोर : लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही आणि मुलाबाळांची उपासमार होत असल्यामुळे शासनाकडे जीवनावश्यक वस्तूंच्या 
शिधाकिटसाठी विनवणी करणारे कामगार आज रविवारी (ता.१७) सकाळी दारुच्या दुकानासमोर दारू घेण्यासाठी रांगेत उभे होते.

नेरे (ता.भोर) येथे कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे भोरमधील सुरु झालेल्या कंन्टेन्मेंट झोनचा कालावधी संपल्यामुळे मद्यविक्रीची 
दुकाने रविवारपासून सुरु झाली. त्यामुळे मद्यपींमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले. प्रशासनाने मद्याच्या होम डिलीव्हरीला 
प्राधान्य देण्याचे आवाहन केले असतानाही शहरातील काही वाईन शॉप सकाळपासूनच उघडली गेली. त्यामुळे वाईन शॉपसमोर 
ग्राहकांच्या रांगा लागल्या. घरात मुलाबाळांना खाण्यासाठी काहीही नाही तरीही ते कामगार रांगेत उभे होते. आपणाला दारु मिळावी यासाठी सर्व ग्राहक दुकानासमोर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करीत होते.  दुकानासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्यामुळे पोलिसांनी मद्यविक्री बंद करावयास लावली. आणि घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) सुरु करण्यास सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी भोरमधील बाजारपेठ व सर्व दुकाने बंद असल्यामुळे बाहेरगावातील नागरिक शहरात आलेले नाहीत. परंतु सोमवार (ता.१८) पासून मात्र वाईन शॉपसमोर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून शहरातील सर्व दुकाने ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडी राहणार आहेत. परंतु सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

धोका टळलेला नाही...

भोर शहराजवळील भोलावडे येथील एका संशयितास शनिवारी (ता.१६) रात्री कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्याला नेले आहे. 
वडगाव झांजे (ता.वेल्हे) येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात तो आला होता. वडगाव झांजेमधील कोरोनाग्रस्त हे काही दिवसांपूर्वी भोलावडे येथे येऊन गेले होते. त्यामुळे भोरवासियांकरीता कोरोनाचा धोका टळला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोरमधील दुकाने ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणार असली तरीही. नागरिकांनी रस्त्यांवर किंवा दुकानात गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT