PERA_CET sakal
पुणे

खासगी विद्यापीठांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा CET

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- मीनाक्षी गुरव

पुणे : प्रीमिनन्ट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशन (पेरा) या राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘पेरा सीईटी २०२२’ परीक्षा येत्या २६ ते २८ दरम्यान ऑनलाइन प्रॉक्टर्डद्वारे घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अभियांत्रिकी, बायोइंजीनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाइन आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या ऑनलाइन नाव नोंदणीसाठी २० मे ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल ३ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी दिली.

पेरा ही खासगी विद्यापीठांची संघटना दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘www.peraindia.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले आहे.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वकर्मा विद्यापीठ, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोर्फेशनल युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील विद्यापीठ, श्री बालाजी विद्यापीठ (पुणे), संदीप विद्यापीठ (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद), विजयभूमी युनिव्हर्सिटी, सोमय्या विद्यापीठ (मुंबई), डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ (कोल्हापूर) ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT